दंगल

एक ठिणगी त्याने अलगद
दोघांमध्ये टाकली होती
विचारांच्या वैष्याने मग
माणुसकी सोडली होती

त्याच ऐकून त्यांनी मात्र
मशाल हाती घेतली होती
दोघांमधल्या दंगली मध्ये
त्यांचीच घरे पेटली होती

उजेड देणारी ती ही
उजाड सार करत होती
ठिणगी मुळे एका त्याच्या
तीही आज तेवत होती

जेवढं हव तेवढच आम्ही
डोळ्याने पहात असतो
माळावरच्या सभेमध्ये
फक्त दंगली घडवत असतो

आपले विचार आपल्या घरी
इतकाच काय तो विषय होता
रस्त्यावरच्या भोंग्यांमध्ये
आता फक्त गोंगाट होता

बस झालं आता सार
नको कुठलीच सभा
नागरिक बनून देशासाठी
आधी उभा रहा.

घर बनव, माणसं जोड
नंतर सगळं बघ
उठ माणसा आता
जग जिंकायचं बघ.

-अनमोल कुलकर्णी

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments