अश्राप मी तरीही

जगणे नव्हेच माझे, जळणेच फक्त आहे
अश्राप मी तरीही, नियती विरुध्द आहे ।।१।।

सत्यात स्वप्न येणे, ते दूर आज राहो
स्वप्नात भंगलेल्या, रमणे सुरुच आहे ।।२।।

ते सुख या नशिबी, नाही अभागी जीवा
उद्धस्त स्वप्नमाला, माझे नशीब आहे ।।३।।

तरीही निराश नाही, अजुनी उगीच वाटे
उजळेल भाग्य उद्या, आशा अजून आहे ।।४।।

घडले जरी न काही, जगणे सुरुच आहे
मरणे कठीण झाले, म्हणुनी तरुन आहे ।।५।।
आनंद कुलकर्णी

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments