शेवटची शांत झोप

वाट बघतो आहे अता शेवटच्या शांत झोपेची,
डोळे मिटून बराच काळ झाला…

थंबली ती वार्याची ये जा केव्हाचीच,
ह्र्दयाचा ठोकाही चुकला…

स्वप्नांची एक दोरी होती अजुन बाकी तुटायची,
बहुतेक तिनेच पाय ओढून धरला…

आंधळी झाली रात्र ही,
चंद्र ही अता परका झाला…

मी मात्र अजुनही वाट बघतोच आहे,
त्या शेवटच्या शांत झोपेची…..

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments