शब्द मुके होतात तेव्हा,
नजर तुझी बोलते.
ओठांतील गुपित मग,
हळूच मला सांगते.

श्वासांची लगबग तुझ्या,
सये मला जाणवते,
नजरेची जादू तुझ्या,
काही वेगळीच असते.

हसतेस कधी स्वतःशीच,
कधी स्वतःशीच रूसतेस,
बोलुनही सर्वकाही,
गुपीत मनामधे ठेवतेस.

बावरते नजर कधी,
मग जरा घाबरतेस,
बावरल्या नजरेनी
माझाच शोध घेतेस.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments