पाऊस आणि प्रेयसी

पाऊस आणि प्रेयसी, दोघेही किती स्वार्थी असतात,
आपल्या मनासारखे कधीच नाही, त्यांना हवे तेव्हाच बरसतात.

कितीही वाट पाहिली चातकासारखी तरीही एक थेंबही बरसत नाही,
पन जेव्हा ठरवतो अता विसरायचे तिला, डोळ्यांतील अश्रू स्मॄती विरू देत नाही.

तो भिजवतो, ती रडवते, तो अठवतो, ती विसरते,
तो अवेळी गाठतो फजीती करतो, ती मात्र खुप दुर जाते.

पाऊस अणि प्रेयसी दोघेही खरच स्वार्थी असतात,
फरक फक्त हाच तो पुन्हा येतो अण तीची मात्र आठवण राहते.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments