एक पावसाळी रात्र

दाटले नक्षत्र नभी,
क्षण सरींची बरसात झाली.
आज ही रात्र सखे,
तुझ्या आठवणीने ओली झाली.

पावसाचे निमीत्त झाले,
ढग आठवणींचे दाटून आले.
पडत्या थेंबात प्रत्तेक,
अश्रू माझे विरून गेले.

काळोख दाटला आता,
नाद उरला फक्त सरींचा.
होइ का सखे मग,
मज भास तुझ्या पैंजणांचा.

पावसाची रात्र ही,
मंद मंद सरत आहे,
तुझ्या आठवणीत सखे,
मी मात्र कविता बनून भिजत आहे

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Sameer

Fabulous