नवविधा भक्ती

भगवंत प्राप्ती करून घेण्याचा महत्वाचा एक मार्ग म्हणजे भक्तिमार्ग. “भक्ती” ह्या दोन अक्षरांमध्ये सर्वव्यापी भगवंत सहज समावून जातो. अश्या ह्या दिसायला लहान असण्याऱ्या शब्दाची ताकद मात्र फार मोठी आहे. अश्या ह्या व्यापक शब्दाचा अर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या दासबोधातील “नवविधा भक्तीच्या” माध्यमातून आपल्यासमोर उलगडत जातो. ह्या प्रकरणामध्ये स्वामींनी भक्तीचे नऊ पदर आपल्याला समजवून सांगितलेले आहेत. स्वामींनी नऊ अंग असणाऱ्या भक्तीला त्यांच्या शब्दालंकाराने सजविले आहे. तर मंडळी, मी आज ह्याच अनंत, व्यापक अश्या नवविधा भक्तीविषयी आपल्याशी थोडक्यात संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे.

या नवविधा भक्तींमधून मला आवडणारी भक्ती, मी अशी सहजपणे वेगळी काढू शकत नाही. त्याचे कारणही तसेच आहे. ही नवविधा भक्ती म्हणजे परमेश्वरप्राप्ती साठी बनवलेली शिडी आहे. तर मग ह्या शिडीतील एखादीच पायरी महत्वाची कशी असू शकेल? एक-एक पायरी चढून आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घेयची आहे. आता जर मी तुम्हाला विचारले की, तुम्हाला तुमचे हात आवडतात की पाय? डोळे आवडतात की कान?? आता हे प्रश्न आपल्याला किती चुकीचे वाटतात ना..? अगदी तसेच आहे ह्या भक्तीचे. आपण लक्ष्यात घेतले पाहिजे ह्या नऊ अंगांनी मिळून जी तयार झाली आहे ती “भक्ती“… आपण आपल्या जीवनात प्रत्येक अंगाचा स्वीकार केला पाहिजे म्हणजेच प्रत्येक पायरी चढून परमेश्वर प्राप्ती करून घेतली पाहिजे.

भक्ती करणे म्हणजे आपल्या “शरीररुपी स्व” पासून विभक्त होऊन भगवंतात रत होणे.. भक्ती म्हणजे आपण आपल्या “गुणविभाग” आणि “कर्मविभाग” यांच्या पलीकडे जाऊन त्या आनंताशी एकरुप होणे आणि तो भगवंत ह्या दोन्ही विभागापासून “निर्लेप” म्हणजेच निराळा आहे हे जाणणे होय. तर सर्वात अगोदर ह्या नवविधा भक्ती कोणत्या आहेत ते आपण पाहूया.

१) श्रवण भक्ती
२) कीर्तन भक्ती
३) स्मरण भक्ती
४) वंदन भक्ती
५) अर्चन भक्ती
६) पादसंवाहन भक्ती
७) दास्य भक्ती
८) सख्य भक्ती
९) आत्मनिवेदन भक्ती

आपण प्रत्येक भक्तीचा अवलंब करून परमेश्वर प्राप्ती करून घ्यावी. जर आपण आपली निष्ठावान भक्ती आपल्या भगवंताला अर्पण केली तर संत गोरोबाकाका यांच्या सारखी स्थिती आपल्या जीवनात निश्चितच येईल. गोरोबाकाका त्यांच्या अभंगात म्हणतात “निर्गुणाचे भेटी आलों सगुणासंगें । तंव झालों प्रसंगीं गुणातीत“..

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments