निसर्ग ! तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा. जश्या एका नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच निसर्ग आपल्या दोन बाजू दाखवत असतो. काही लिखित तर काही अलिखित. तो श्रावणाच्या महिन्यात मोरांनाही नाचवतो आणि माणसांनाही. यामध्ये मनापासून कोण आनंद घेतो हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. म्हणायला गेलं तर हा त्या माणसाचा आणि मोराचा खाजगी प्रश्न. ? हा… हा… हा…
पण जेव्हा हा खाजगी प्रश्न सार्वजनिक होतो तेव्हा आठवतो नुकताच होऊन गेलेला महापूर आणि latest गाजलेला Corona मामा.(जसा कृष्णाला कंस मामा???) हा म्हणजे एक अलिखित पण माणसाने दुर्लक्ष करून वाचलेला उतारा.
नुकतीच सत्तरी पूर्ण करणारे रामुकाका भुतकाळ आठवत आणि वर्तमानात नातवडांबरोबर रमत, सट वाईने चालवलेल्या रस्त्यावर चालत होते. त्यांनी घालवलेलं तरुणपण नक्कीचं आपल्यापेक्षा वेगळं व निसर्गमय असणार. त्यांनी तरी बदलता निसर्ग मान्य केलाच होता. तसाच तो आठवत मागे सोडला होता.सगळं अगदी यंत्रमय चाललं होत. वाफेच engine ते sophia पर्यंत बनवलेल्या मानवनिर्मित आणि माणसाशी बरोबरीची स्पर्धा करणाऱ्या यंत्रा पर्यंत. शेजारी एक बाग होती. अगदी जुनीच. पण तिथली पाने मात्र आपल्याप्रमाणे modern झालेली. रामुकाका तरुण होते तेव्हा त्या बागेच्या पारावर कमालीचे विविध पक्षी न्याहारी करायला यायचे. हळूहळू ही न्याहारी कमी होऊ लागली. जागिकीकरणा बरोबर त्यांनी हे ही स्वीकारलं होत.
अचानक एक अलिखित घडलं. हल्ली PUBG खेळायला राखीव असलेला पार आज मात्र विविध पक्ष्यांनी भरून गेला आणि रामुकाकांना तारुण्यात घेऊन गेला. बागेतला मोरही आवाज देऊ लागला. हे कौतुक नातवंडांना सांगण्याच्या थाटात ते उठले. दोन पावले चालले सुद्धा.पण मध्येच थांबून विचार करू लागले की नक्की नातवंडांना सांगायचं काय?
पहिला प्रश्न असा, हे असच निसर्गमय राहिल की पुन्हा जागतिकीकरणाच्या नव्या अध्यायाची तयारी करावी लागेल.
दुसरा प्रश्न असा, जर ही जादू असेल तर मग Corona मामा ने काढलेल्या तिकिटावर तात्पुरती show ची मज्जा घ्यायची की स्वतःचा premium भरायचा?
आपल्यात असे बरेच रामुकाका आहेत. असे बरेच प्रश्न आपल्यालाही पडले आहेत.

आता मात्र हा रामुकाकांचा खासगी प्रश्न आहे?.
– टिचकी….!

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments