दिवस उगवतो नेहमीसारखाच, तो सृष्टीचा नियमच आहे – म्हणून मी माझाही दिवस चालू करतो. सूर्यउगवला म्हणून रात्रीचा अंधार नाहीसा होतो पण फक्त बाहेरच्या जगातला, मनातला अंधार मावळत नाहीआणि मग बाहेरच्या प्रकाशामुळे आतल्या अंधाराला त्रास लागतो. आतल्या अंधाराला स्वतःचे अस्तित्वनष्ट होण्याची भीती वाटू लागते आणि मग मन आतल्या आताच गुंतत जाते. गुंता – माहीत नाही मनातीलभावनांचा की विचारांचा? की दोन्हीपण एकत्र आल्यामुळे होणारा, पण गुंता होतो एवढा नक्की! तसं माणूसडोक्यानेच विचार करतो पण मग मानाचं काम काय? भावनांना जागवायचं? की भावनांना थोपवायचं?….कीविचारांना थोपवायचं?? पण विचारांवर मनाचा हक्क काय? विचार तर डोक्याची मिळकत, विचारांवर तरमालकी हक्क डोक्याचा मग विचारांना मन का थोपवते? भावना विचारांना का थोपवते? बऱ्याचदा डोक्यावरमन प्रभुत्व का गाजवते? मन तसं स्वछंदीच, क्षणात इथे तर क्षणात तिथे, अतिशय बेशिस्त,आडवळणाने चालणार, कुणाचाही न ऐकणार पण याच्या अगदी उलट डोक! सरळमार्गी असलं तरी चालकरणारं, चांगलं-वाईट, फायदा-तोटा याचा विचार करणारं, सैनिकी शिस्त असलेलं, मग अस असेल तरीहीमनाच डोक्यावर अधिपत्य का? डोकं जर एवढा विचार करत असेल तर त्याला स्वतःचा फायदा तोटा कळतनसेल का? कळत असेलच तर मग त्याने मनाची गुलामगिरी का पत्करावी? का यातही त्याचा काही स्वार्थआहे? हो, असेलच – डोकं आहे शेवटी! स्वतःच्या फायद्याशिवाय एकही विचार करणार नाही, आणि विचारझाल्याशिवाय कृती घडणार नाही आणि कृती घडल्याशिवाय नफा की तोटा हे कळणार नाही. पण मग कृतीजर विचारांतूनच होणार असेल तर मग भावनांचं काम काय? परत तोच प्रश्न… विचारांना चालना द्यायचंकी त्यांना थांबवायचं? पण मग विचारांना चालवणाऱ्या किंवा थांबवणाऱ्या भावना कोण? आणि त्याविचारांशी अस का वागतील? त्या तर आपापल्या मदहोश, कशाचीही फिकीर न करता पाखरांसारख्याबागडतात ना? मग त्यांना विचारांशी काय घेणं देणं? हा प्रश्न सतावत राहतो नेहमी मनाला….. मनाला कीडोक्याला? डोक्यालाच! कारण प्रश्नाला शब्दांत बांधता येत आणि शब्दात बांधता येईल ती भावना असूशकत नाही म्हणून तो विचारच असला पाहिजे. प्रश्न म्हणून प्रश्नार्थक विचार, आणि विचार ही डोक्याचीमालमत्ता म्हणून हा प्रश्न डोक्याला पडतो, पण उत्तर सापडत नाही.

सूर्य हळूहळू डोक्यावर चढायला लागतो, सकाळच्या कोवळ्या उन्हाची जागा, रखरखीत उन्हे घेतात आणिआतल्या अंधाराची आणि बाहेरच्या उन्हाची आता गट्टी जमते कारण दोघांचाही उद्देश एकच – मला त्रास देणं! सूर्य वरवर चढत जातो तसा गुंता अधिकच किचकट होत जातो. डोक्यातून एखाद्या विचाराचा बाण सुटतो, कृती करायला प्रवृत्त करतो, शरीरही त्याला दिलखुलासपणे प्रतिसाद देतं आणि मग भावनेची भिंत आडवीयेते. या दोघांचं जणू सात जन्माचं वैर आहे. विचारांचा बाण कोलमडून पडतो आणि भावनेची भिंत जगजिंकल्याच्या आनंदात आपल्याच जागेवर ठाम राहते आणखी विचारांच्या बाणांना थोपवायला. विचारांचेबाण सुटताच राहतात, भिंत मात्र तटस्थपणे राहते. विचार भावनांवर अधिपत्य गाजवतच नाहीत, विचारगळून पडतात म्हणून कृती होत नाही म्हणून शरीराच्या यंत्राला गंज लागू लागतो आणि मग हळूहळू भावनाशरीराचं अधिपत्य घ्यायला लागतात. विचारांना मुळासकट उपटून टाकून, शरीरावरचं डोक्याचं राज्यहिसकावून घेऊन कृतींवर विजय मिळवतात. तरीही डोक्याचं अस्तित्त्व कुठेतरी उरतच. एखाद्या खुरट्याझाडाप्रमाणे विचारांची पालवी फुटते पण तोपर्यंत शरीराचा ताबा मानाने घेतलेला असतो जसा संध्याकाळच्यानारंगी उन्हाने जणू पृथ्वीला कवेत घ्यावे अगदी तस्स! दोघेही स्वछंदी, बेफिकीर. दोघेही पृथ्वीसोबत सोनेरीरंगात न्हाऊन निघतात आणि मग मन स्वप्न पहातं, शरीर तशी कृती करतं आणि मन स्वतःचच एकसाम्राज्य उभारत. स्वप्नांचं, फुलांचं, ताऱ्यांच, स्वर्गाचं मुळात अवास्तवतेच. मुळातच साम्राज्य स्वप्नांचंम्हणून क्षणभंगुर. स्वप्नाला मुळात आयुष्यच किती? वास्तव समोर न येईपर्यंत! आणि वास्तव म्हणजेकाय? केलेल्या विचारांची नाही, झालेल्या विचारांची झालेली सांगड. इथे परत विचारच आला. साम्राज्यस्वप्नांचं, स्वप्न मनाची मग मनाच्या स्वप्नांचं साम्राज्य कधीपर्यंत? विचारांचं वास्तव समोर येत नाहीतोपर्यंत! वास्तव विचारांचं, विचार डोक्याचा म्हणजे आता अधिपत्य कोणाचं विचारांचंच म्हणजेच डोक्याचं. मनाचं साम्राज्य उध्वस्त होत, मनाची स्वप्न पिकल्या पानांसारखी गाळून पडतात आणि अंधार होतो. आतहीआणि ……..बाहेरही. मनाच्या भावनांसारखच सूर्याचाही अस्तित्व संपत आणि रात्र चढत जाते. अंधार गडदहोत जातो आणि पुन्हा डोक्याचं, विचारांचं राज्य शरीरभर प्रभुत्व गाजवतं. भावनांना, मनाला पराभूतपराभूत केल्याचा त्यांचा जल्लोष चालू होतो. आता विचारांना बाणांची भिंत आडवी येत नाही. विचारांचे बाणसपासप सुटत जातात, रात्र अजूनच गडद होत जाते. डोळ्यांवर झोपेची धुंदी चढते आणि विचारांचे बाणस्वप्नरूपात झोपेत दिसू लागतात. पण ………? स्वप्न तर मानाचं साम्राज्य ना?? मग विचारांचं मूर्तप्रकटन स्वप्नांमधून कस काय? हा प्रश्न बोचतो… हा प्रश्नार्थक विचार बोचतो डोक्याला. उत्तर सापडतनाही. विचारांचे बाण अजून सपासप सुटू लागतात, प्रश्नांचं उत्तर काहीकेल्या सापडत नाही. मग नाईलाजानेविचारांचे बाण थांबतात. मनाच्या भावनेची भिंत शोधतात पुन्हा मनाच्या, भावनेच्या स्वाधीन होण्यासाठी, कारण राज्य जिंकल्यानंतरच जे सुख आहे तेच जर पराधीन असेल तर त्या साम्राज्याचा उपयोग नाही असाफायद्या-तोट्याचा विचार डोक्याकडून होतो. विचारांचे बाण मनाच्या स्वाधीन होतात. स्वप्नांमुळे. स्वप्नदेखील मग मनासोबत स्वछंदीपणे बागडू लागतात आणि त्यांना पाहून विचारांनाही मुक्तपणे बागडण्याचामोह आवरत नाही आणि मग…. ते सुद्धा पाखरांगत बागडू लागतात स्वछंद, मुक्त… भावनांसारखे. एका एकाविचारांच्या बाणाच एक एक भावनेचं फुल होत आणि स्वप्नांच्या वेलीवर बहरू लागत आणि चैतन्याची पाहतहोते. श्वास मोकळा होतो, नवीन स्वप्नं रंगू लागतात आणि हळूहळू गुंता सुटू लागतो. शरीर मोकळ होत,हलकं होत. डोकं आणि मन दोघेही शांत होतात, एकरूप होतात. आयुष्य सुंदर होत. गुंता सुटतो. प्रश्नसुटतात. स्वप्नांमुळे. स्वप्न…

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments