पळशीकर वाडा/भुईकोट

# पुण्यापासून अंतर~ १३० किमी (ऐका बाजुने फक्त जाणे)

# जाण्याचा मार्ग –
पुण्यापासून पारनेर फाट्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ३६ किमी अंतरावर टाकळी – ढोकेश्वर लेणी – तिथुन १५ किमी खडकवाडी-पुढे ५ किमी पळशी गाव

# आजुबाजुची पर्यटनस्थळ-
टाकळी ढोकेश्वर लेणी
जामगावचा भुईकोट
राळेगणसिद्धी (आर्दश गाव)
शेजारीच विठ्ठल – रुक्मिणी मंदिर आहे

# वाड्याबद्दलची माहिती-
महाराष्ट्र पळशी नावाची बरीचशी गावे आहेत. परंतु हे गाव या सर्वांना आपल्या काष्ठशिल्पामुळे(लाकडी कोरीव काम) इतरांपेक्षा वेगळे ठरते. कारण पळशी गाव हे लाकडी कोरिव कामामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात जग सर्वोच्चतेचं परिमाप आहे. गावात प्रवेश करताच आपल्याला प्रचंड मोठे गडासारखे प्रवेशद्वार दिसते ते इतके प्रचंड आहे की, त्यामधुन मोठ्ठी वाहने देखील सहज प्रवेश करू शकतात. संपुर्ण गाव हे याच दगडी तटबंदीच्या आतमध्ये वसलेलं आहे. या तटबंदीला ऐकुन १६ बुरूज आणी ४ प्रवेशद्वार आहेत. गावात प्रवेश केल्यानंतर गावामध्ये कोणालाही पळशीकर वाडा विचारल्यानंतर सहज पत्ता सांगतात. पळशीकर वाडा हा रामराव कृष्णराव कांबळे-पळशीकर यांच्या मालकिचा आहे. ते सध्या मध्यप्रदेश इथे स्थायिक झालेले आहेत. वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपली संस्कृती किती महान आणि व्यापक, भव्य होती याची प्रचिती येते. या वाड्यामध्ये जे लाकडी नक्षीकाम आहे त्याची तुलना कशा सोबतच नाही होऊ शकत. वाड्यात ऐक बालाजी मंदिर आहे जे फारसे दाखवले जात नाही. वाडा हा २ मजली आहे. वाड्याला तळघर आहे जे सध्या बंद केलेले आहे. वाड्यामधुन २ गुप्त मार्ग आहेत. जे वाड्या मागील २ वेगवेगळ्या मंदिरात जातात. वाड्यात ऐक आड (पुर्वीची छोटी विहीर) आहे. ज्याचं पाणी मात्र खारट आहे. वाडा हा २ मुख्य चौकात विभागला आहे. आणि वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वाड्याचे सर्वात सुंदर कोरिव लाकडी खांब पाहायला मिळतात. तसेच आणखी ऐक बैठकीची जागा आहे. जिथे पुरातन काळातील चित्रे भिंतीवर काढलेली आहेत.

# वैशिष्ट्ये-
विहीरीतील पाणी खारट तर आहेच सोबत त्या वाड्यामध्ये ऐक छोटीशी साधारण ५ इंच अशी वस्तु आहे जी केवळ अद्भुत आहे. कारण तिथे ऐक पात्र आहे ज्यामध्ये २ मुर्त्या आहेत. उभी जी मुर्ती आहे ती पांडुरंगाची मुर्ती आहे आणि पांडुरंगाच्या हातामध्ये बाळकृष्णाची झोपलेली मुर्ती आहे या पात्राचे वैशिष्ट्य असे आहे कि त्या पात्रांमध्ये पाणी भरल्यानंतर त्याच्या खालच्या भागाला ऐक छिद्र (होल) आहे तरी सुद्धा त्यामधुन पाणी बाहेर पडत नाही. मात्र त्याच पात्राच्या बाळकृष्णाच्या पायाला पाणी लागताच पाणी लगेच त्याच छिद्रामधुन गळु लागते. वाचुन लक्षात कदाचीत नसेल आलं तरीसुद्धा ते तुम्ही व्हिडिओ मध्ये प्रत्यक्ष पाहु शकता.
जेवणाची सोय- गाव फारच लहान असल्यामुळे तिथे नाष्टा सुध्दा मिळत नाही. जेवण टाकळी ढोकेश्वर इथेच मिळते.

# प्रवासखर्च –
मी एकाच दिवशी या दोन्ही ठिकाणी भटकंती केली होती ६००/- पेट्रोल

# मार्गाची स्थिती-
केवळ ५ किमी मार्ग थोडासा खराब आहे. पण तिथेही काम चालुच आहे.

# टिप-
1. वाड्याचे मालक मागिल १० वर्षातुन फक्त १ वेळीच आले आहेत. ते संस्थानिक आहेत. सध्या मध्यप्रदेश इथे स्थायिक असल्यामुळे त्यांच्याबद्दल फारशी माहिती मिळु शकली नाही.
2. व्हिडियो मध्ये लहान मुलानी चुकून विठ्ठल असा उल्लेख केला आहे. तर ती विठ्ठलाची मूर्ती नसून वसुदेव आणि कृष्णाची आहे.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments