माय मराठी

माय मराठी
भाषारुपी माऊली जगाची,
आपली माय मराठी |
जिथे विविधतेने भरून वाहतो,
साहित्य ओढा प्रत्येकांसाठी ||
अभंग, ओवी, पोवाडा, कथा,
भारुड, कविता, चारोळी |
अखंड परंपरा ह्यांना असूनी,
आजन्म संत सांभाळी ||
पोथी, पुस्तके, नाटक असू दे,
वा असू दे चित्रपटांची चंगळ |
मराठी बांधवांनी नेहमीच,
आनंदली साहित्याची दंगल ||
अखंड महाराष्ट्र हसला, रडला,
ह्यांच साहित्यामुळे |
जनामनांत रुजली गेली,
माय मराठीची पाळेमुळे ||
ज्ञानोबा, तुका, एकनाथ,
शिवबा, रामदास, जनाबाई |
हीच परंपरा पुढे नेली ती,
कुसुमाग्रज, पुलं नी बहिणाबाई ||
माझ्या भाषेला असू दे,
एक अखंड झालर प्रेमाची |
आईप्रमाणे वात्सल्यमुर्ती ती,
फुटू दे नवी पालवी नात्याची ||
लोप पावू नये ही प्रगल्भता,
गर्व असू द्या राजभाषेचा |
नखशिखांत भिजुया, करुनी साजरा
गौरव दिन माय मराठीचा ||
“कविमोल” अमोल बारई

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments