आत्महत्या आणि नैराश्य

आत्महत्या आणि नैराश्य

हल्ली माणसे काही एकत्र राहतात काही दूर राहतात पण मनाने जवळ असतात का ??
कारण त्यांच्यातला संवाद संपलाय जर संभाषणा नाही तर एकमेकांची ओळख ही नीट पटली जात नाहीये आणि मग खूप एकाकीपणा आणि एकलकोंडेपणा वाढत जातो त्यामुळेच नैराश्याने ग्रासला जातो आणि आत्महत्या करायला माणूस प्रवृत्त होतो.
नैराश्य किंवा उदासीनता
ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते.
माझ्या ओळखीतली बाई तिला गुडघ्याचा आजार झाला त्याच्यामुळे घरीच बसू लागली आणि कुठे न जाता घरातच एकटी राहू लागली त्यामध्ये तिला व्यसन ही लागले .मजा म्हणून घेणारे ड्रिंक म्हणजेच दारु ती आता तिची रोजची सवय झाली आणि त्यात खोल खोल बुडत गेली .आता तर ती सर्व काही त्याच जागेवर ती करत होती आणि शेवटी ती गेली स्वतःला संपवलं .हो निराश झालेली माणसं अशीच स्वतःला संपवतात आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती अशीच खोल खोल गर्तेत जातात.
डिप्रेशन किंवा नैराश्यात असलेले लोक जगाकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पहातात. जणू त्यांनी नकारात्मक विचारांचा चष्मा घातलेला असतो.
नेहमी हसमुख किंवा लोकांमध्ये मिसळणारा व्यक्ती अचानक एकटा राहू लागला, अबोल झाला. . सतत निराशावादी बोलणं, मृत्यूची भाषा करणं, ही काही आजाराची लक्षणं आहेत. एखाद्याच्या आयुष्यातल्या या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
नैराशाच्या आलेल्या व्यक्तीशी सतत बोलणे आणि त्याला हसत ठेवणे शिवाय त्याला त्याचे विचार लिहून काढायला मदत करणे हे एक त्याच्या रोगावरचऔषध असेल शिवाय मानसोपचार तज्ञ आहेतच त्यांच्याकडे जायला विसरू नये.
हल्ली चाळीशी नंतर किंवा ठराविक वयानंतरही स्त्रियांना खूप निराश वाटू लागतं कारण नवरा ऑफिसला असतो स्त्रिया ऑफिसला असतात किंवा घर सांभाळून ऑफिस करतात किंवा फक्त घर सांभाळतात मुलं त्यांच्या उद्योगात व्यस्त असतात त्यामुळे त्यांना एकट असं वाटतं आणि त्या जाऊन दे सोडून दे नको करायला करून त्या खंगत जातात त्यांच्याशी बोलायला कोणी नसतं नातेवाईक मैत्रिणी मित्र आजूबाजूचे त्यांच्याशी जर नेहमी बोलत राहिले तर त्या अशा निराश होणार नाहीत . पुरुषांच ही तसेच आहे .वय बोलू लागल्यावर हा एकटेपणा वाढतो असं नव्हे हल्लीची तरुण पिढी मध्येही एकटेपणा वाढू लागला आहे आहे आणि त्यामुळेच पटकन मन हरून जातं ..शिवाय आपल्याला स्वतः कशाततरी गुंतवून ठेवले तर ही निराशा येणार नाही .
मनाचा कमकुवतपणा घालवायला मनानेच मजबूत व्हाव लागते नाहीतर अचपळ मन माझे नाव रे आवरीता.
मन हे चंचल आहेच ते असंच भटकून भटकून कुठल्यातरी टोकावर जाते आणि मग आपटते त्याला काबुत ठेवायचं असेल तर मनाचाच बांध घालणं आवश्यक आहे.
प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Rajiv Pujari

छान