सावळा विठ्ठल

श्रद्धाच्या पलीकडे अस्तित्त्व ज्यांचे

जगाच्या गर्दीत तो सापडेल का

शोध घे त्याचा स्वतःमध्ये हरी

भेटेल मंग तुला इथल्या प्रत्येक दगडांमध्ये!!१!!

 

मंदिराच्या आवारात सांग तो राहील का

पाप बुद्धीत तुझ्या तो वास करेल का

शोध घे त्याचा माणसांमध्ये  बघ

मंग भेटेल तो तुला इथल्या प्रत्येकांमध्ये!!२!!

 

सावळा तो विठ्ठल सांग

पंढरीत अडकून बसेल का

जा कुंभमेळ्यात तिथे तुला

तो भक्तांसाठी रडतांना दिसेल !!३!!

 

चंद्रभागेमध्ये तुला वाहताना दिसेल

हाक मार हरीला तुला

तो तुझ्या आई मध्ये दिसेल

मंदिराच्या आवारात सांग तो जगाचा

पोशिंदा अडकून राहील का!!४!!

YOGESH Ganesh Barde

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments