माझी मराठी

माझी मराठी

शब्द शब्द जोडूनी सजली माझी मराठी

घराघरात जाऊनी रुजली माझी मराठी

वळवली अगदी तिकडे वळली माझी मराठी

तिची गोडी असणाऱ्यांनाच कळली माझी मराठी

नव्या जून्याना सोबत घेऊन चालली माझी मराठी

साऱ्यासोबत एकनिष्ठ राहिली माझी मराठी

ज्ञानेश्वरी,लीळाचरित्रेत सामावली माझी मराठी

महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यात पोहचली माझी मराठी

सोलापूरी वराडी आहिरानित बोलली माझी मराठी

आस्थित्व कायम ठेऊन आदराने झुकली माझी मराठी

ओव्या श्लोक भारुडे रचणारी माझी मराठी

सौंदर्याने भूरळ पाडणारी माझी मराठी

शब्दांच्या रत्नांनी नटनारी माझी मराठी

गरीब श्रीमंत अगदी सगळ्यांना पटणारी माझी मराठी

संपन्न, समृद्ध, परिपूर्ण माझी मराठी

समाजासाठी जणू धनच माझी मराठी

प्रियंका कदम

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments