आपले अजित दादा..

‘दादा ‘हे  नाव ऐकताच मनाला खूप बरं वाटत. आता प्रश्न पडला असेल दादा म्हणजे कोण ? कोण आहेत हे ? तर चला आज मी तुम्हाला एक अशा व्यक्तिमत्त्वावर लिहिणार आहे ते म्हणजे सर्वांचे लाडके नेतृत्व ते म्हणजे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार..

त्यांच्या बद्दल लिहाव, बोलाव तेवढं कमीच मी एक साधा माणूस ,  साधा व्यक्तिमत्त्व , त्यांच्या बद्दल काय बोलणार ,दादा म्हणजे गरिबांचे कैवारी ,गोर गरिबांचे नेते अशा महान व्यक्ती बद्दल लिहित असताना काही चूक झालीं तर मला तुम्ही माफ करा ही विनंती..

अजित पवार हे कोणाचे बाप होते , तर कोणाचे भाऊ, कोणाचे मित्र , तर कोणाचे सल्लागार , जो माणूस चूक करतो त्या माणसाला जाऊन त्याने केलेली चूक त्याला सांगणे व परत चूक होऊ नये म्हणून त्याला त्यावर उपाययोजना करून देणे अस कार्य फक्त आपले दादाचं करू शकतात . आज तुम्हीं पाहिले साधा गावचा सरपंच जरी असला तर त्याच्या मागे किती कामे असतात तर तुम्ही समजून घ्या आपल्या महाराष्ट्र राज्याचं अर्थखात, उपमुख्यमंत्री पद अश्या मोठ मोठ्या पदावर त्यांनी कार्य केले म्हणजे तुम्ही समजून ते किती busy असतात. तरी पण ते वेळात वेळ काढून ते आपल्या मतदार संघातील अडचणी दूर करत, कोणाला गरज पडली त्याच्या गरजेला धावून जात अस हे आपल व्यक्तीमत्व होत.

दादांनी आपल्या मतदार संघासाठी खूप काही केलं पण त्यांनी महाराष्ट्रासाठी जे काही केलं आपण ते विसरू शकत नाही. दादा हे नुसते मंत्री नसून ते कोणाचे तरी वडील असत एकदा गोरगरीब जनतेचा एकदा मुलगा त्यांच्याकडे काही शैक्षणिक अडचण घेऊन गेला तर ते ती अडचण दूर करत असत, ते आपल्या पोटच्या पोरासारखं जपत.एवढ सगळ त्यांनी आपल्या साठी केलं.

उगाच त्यांचा मृत्यू झाल्यावर लाखोंच्या संख्येत जनसमुदाय त्यांच्या अंतिम दर्शनाला आला न्हवता.. तो जो जनसमुदाय होता आपल्या दादाला आपलं मानून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येत होता. दादांनी त्यांचा आयुष्यात खूप मानस कमावली , आणि माणसं जपली ही  आपल्या दादाचं कामाची पोच पावती..

शेवटी एवढेच लिहितो की दादा तुम्ही एवढे लवकर आम्हास सोडून जायला नाही पाहजे होतं..

🥺🥹

Sush..

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments