तो सध्या काय करतोय

तो सध्या काय करतोय??

 

 

हल्ली आपण बघतोय

प्रत्येकजण विचारतो 

ती सध्या काय करते

तिची मुलगी सध्या काय करते

आई कुठे काय करते

मला पण प्रश्न पडलाय

तो सध्या काय करतोय

कॉलेज मध्ये असताना मागे लागणारा..आता काय करत असेल कसा दिसत असेल.ऑफिस मध्ये सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने येवून बोलणारा आता काय करत असेल

विस्मरणात गेलेली माणसे अचानक आठवून त्रास देतात… नाही का??

शाळा कॉलेज चे फर्स्ट क्रश फर्स्ट लव्ह आठवते का??

तुम ना जाने किस जहाँ मैं खो गये……

हे सर्व आठवण्याचे कारण परवा अचानक जुनी मैत्रीण पुष्पा भेटली होती तिच्याबरोबर गप्पांमध्ये जुन्या आठवणी निघाल्या.

ती सांगत होती तिला कोण कोण भेटले ते.

काही जण एकदम आनंदात होते तर काही जणं मात्र घरच्या रामरगाड्यात पिचले होते.

काही जणांनी परस्परांशी घनिष्ठ संबंध ठेवले होते तर काही जणांनी त्याच व्यक्तीशी लग्न केले होते.

माधव आमचा जुना मित्र ..खूप देखणा .नावाप्रमाणे मुलींच्या गोकुळात रमणारा तरीही त्या दोघी सिंमाया आणि चेतना ..मात्र त्याच्यबरोबरच सतत असे .त्यातल्यात्यात सिंमाया मात्र अगदीच नेहमीची.आम्हाला वाटे की सिंमाया आणि माधव बहुतेक लव्ह बर्ड आहेत.

पण लग्नाचे आंमंत्रण आले तेंव्हा पत्रिकेत नावे होती माधव आणि चेतना..आम्ही चाट पडलो होतो.

असाच एक तो पुष्पाच्या ऑफिसला जायच्या वेळी जयंत बसस्टॉप वर उभा असे..पुष्पा मात्र अनभिज्ञ.जयंत चोरून पाहतोय हे तिच्या ध्यानीमनी नसे.एकदा ऑफिस मध्ये शर्मा सर तिला बोलले तुझे काही अफेयर आहे का..

बसस्टॉप वर एक मुलगा रोज तुझ्या सोबत असतो.तेंव्हापासून तिला कळले की जयंत तिच्यावर लाईन मारतोय.

आता ती पण त्याच्याकडे चोरून पाहत असे तो बघतोय की नाही 

एके दिवशी अचानक पुष्पाची ट्रान्स्फर झाली व बस स्टॉप बदलला

कामाच्या घबाडग्यात ती हे प्रकरण विसरली..लग्न झाले मुले झाली.

आणि आता ती विचारत होती जयंत काय करतोय हल्ली.

तर असे होते.

काळाच्या पडद्याआड गेलेली माणसे पुन्हा चक्षुपटलावर येतात आणि आठवणीत आठवण म्हणून रहातात.

 

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Rajiv Pujari

👌👌