नासाची मंगळ मोहीम (भाग तीन )- मोहिमेविषयीची सर्वसामान्य माहिती

 

 

नासाची मंगळ मोहीम -मार्स 2020 (भाग तिसरा )

जाता जाता जाणून घेण्याच्या महत्वाच्या गोष्टी

(A) योजने मधील नांवे :-

1)मार्स 2020- संपूर्ण योजना तसेच अंतराळयानाचे नांव. या अंतराळयानातच रोव्हर पण अंतर्भूत आहे.

2) रोव्हर -व्हर्जिनिया राज्यातील ब्रुक गावच्या लेक ब्रॅडोक माध्यमिक शाळेतील 13 वर्षीय अॅलेक्स मॅथरने सादर केलेल्या निबंधावरून या रोव्हरचे नांव पर्सिव्हीरन्स असे ठेवण्यात आले.

3)हेलिकॉप्टर – (हा एक स्वतंत्र प्रयोग आहे ) अलाबामा राज्यातील नॉर्थपोर्ट गावच्या तुस्कालुसा तालुका माध्यमिक शाळेतील वनिझा रूपाणि या 17 वर्षीय विद्यार्थीनीने सादर केलेल्या निबंधावरून या हेलिकॉप्टरचे नांव इनजेन्यूईटी असे ठेवण्यात आले.

(B) अंतराळयान :-

उड्डाणाच्या वेळचे एकूण वजन (अग्निबाण, रोव्हर, प्रवेश, अवरोह, अवतरण प्रणाली, इंधन असलेला मार्गक्रमण टप्पा व हेलिकॉप्टर यांसह ) = 5,31,000 किलोग्रॅम

(C) मार्स 2020 पर्सीव्हरन्स योजनेतील महत्वाचे घटक

(i) पर्सिव्हीरन्स रोव्हर

(ii)मार्गक्रमण टप्पा (मंगळाकडे उडण्यासाठी )

(iii) कवच – यामध्ये मागील कवच व उष्णता अवरोधक कवच (हे कवच मंगळाच्या भूपृष्ठाकडे यान अवरोहित होत असतांना निर्माण होणाऱ्या उष्णतेपासून यानाचे रक्षण करते ) यांचा समावेश होतो.

(iv) अवरोह टप्पा- या टप्प्याद्वारा स्काय क्रेनच्या मदतीने रोव्हरला मंगळभूमीवर उतरविण्यात येईल.

आता आपण पर्सिव्हीरन्स रोव्हर विषयी विस्ताराने जाणून घेऊ.

पर्सिव्हीरन्स रोव्हर

(अ) वजन :- 1025 किलोग्रॅम ; यामध्ये 45 कि.ग्रॅ. वजनाच्या यांत्रिक हाताचा समावेश आहे. या यांत्रिक हाताच्या शेवटी टरेट बसवलेले आहे.

(ब)आकारमान :-

लांबी -10 फूट (यांत्रिक हाताशिवाय)

रुंदी – 9 फूट

उंची – 7फूट

रोव्हरला 7 फूट लांबीचा यांत्रिक हात बसवला आहे.

(क)बसवलेली वैज्ञानिक उपकरणे

(i)मास्ट कॅम Z

(ii)मार्स इन्व्हायरॉन्मेंटल डायनॅमिक्स ऍनालायझर (मेडा )

(iii) मार्स ऑक्सिजन इन सिटू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट (मॉक्सि)

(iv) प्लॅनेटरी इन्स्ट्रुमेंट फॉर एक्स-रे लिथोकेमिस्ट्री (पिक्सल)

(v) रडार इमेजर फॉर मार्स सबसरफेस एक्सपेरिमेंट (रिमफेक्स)

(vi) स्कॅनिंग हॅबिटेबल इन्व्हायरनमेंट्स विथ रमण अँड ल्युमिनस फॉर ऑरगॅनिक्स अँड केमिकल्स (शेरलॉक)

(vii) सुपरकॅम

(ड)नमुने साठवण व्यवस्था :-

यात ड्रिल बिट्स असणारा फिरणारा पट्टा आहे. पट्टयावरील ड्रिलबीट्स मंगळाच्या जमिनीवर ड्रिलिंग करून (ट्रिपॅनिंग करून) खडकाचे खडूच्या आकाराचे तुकडे काढतील. हे तुकडे सॅम्पल कलेक्शन ट्यूब्ज मध्ये ठेवले जातील, या ट्यूब्स सील केल्या जातील. एकंदरीत 43 सॅम्पल कलेक्शन ट्यूब्ज आहेत, यांतील 5 ट्यूब्स या ‘ विटनेस ट्यूब्स ‘ आहेत.

(इ ) ऊर्जा :- अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीने पुरवलेला मल्टी मिशन रेडिओआयसोटोप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर (MMRTG) रोव्हरला 110 वॅट स्थिर प्रवाही विद्युत ऊर्जा पुरवेल. ही ऊर्जा प्लुटोनियम-238 च्या नैसर्गिक क्षयामुळे निर्माण होईल. ज्यावेळी MMRTG ने पुरविलेल्या उर्जेपेक्षा जास्त ऊर्जेची आवश्यकता भासेल, त्यावेळी लिथीयम- आयनच्या दोन रिचार्जेबल बॅटरीजद्वारा ती पुरावली जाईल.

(फ) मायक्रोफोन्स :- सुपरकॅमवर एक आणि रोव्हरच्या बाजूला एक असे दोन मायक्रोफोन्स लोकांना मिशनशी जोडण्यासाठी बसवले आहेत. नंतर ते प्रवेश, अवरोह व अवतरण यांच्या पृथ:करणासाठी वापरले जातील.

(D)आता आपण इंजेन्युइटी विषयीची माहिती घेऊया :

(अ)वस्तुमान – 1.8मग

(ब )उंची – 0.49 मीटर्स

(क ) पात्यांची रचना – 1.2 मीटर एकूण लांबी असलेल्या उलट सुलट फिरणाऱ्या पात्यांच्या दोन जोडया प्रत्येक मिनिटाला 2400 परिभ्रमणे करणार आहेत.

(ड) आकारमान – 13.6 सेंटिमीटर x 19.5 सेंटीमीटर x 16.3 सें. मी. असून त्याला 0.384 मीटर्सचे चार पाय आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टर जमिनीपासून 0.13 मीटर्सवर असणार आहे.

(इ ) ऊर्जा – एका मंगळदिवसांत 90 सेकंद उडण्यासाठी लागणारी ऊर्जा सौरपंखांद्वारा पुरवली जाईल. हे सौरपंख लिथियम – आयन बॅटरी चार्ज करतील व उड्डाणाच्या दरम्यान लागणारी साधारण 350 वॅट ऊर्जा पुरवली जाईल.

(E) कॅमेरे :- मार्स 2020 पर्सिव्हीरन्स मिशन मंगळावर 25 कॅमेरे नेत आहे. ही संख्या आजपर्यंतच्या डीपस्पेस मोहिमांमध्ये वापरलेल्या कोणत्याही कॅमेरांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

(अ) यांपैकी रोव्हरवर 19 कॅमेरे आहेत. 9 रंगीत कॅमेरे तंत्रज्ञानासाठी, तीन कॅमेरे प्रवेश, अवरोह व अवतरण यांसाठी ( त्यांतील एक कृष्ण-धवल कॅमेरा भूप्रदेश संदर्भिक दिकचालनासाठी, दोन रंगीत कॅमेरे लोकांना या मोहिमेशी जोडण्यासाठी आणि प्रवेश, अवरोह व अवतरण यांच्या पुनःरचनेसाठी ), दोन झूम असलेले रंगीत कॅमेरे मास्ट-कॅम झेड साठी, एक रंगीत सुपरकॅमसाठी, दोन रंगीत शेरलॉकसाठी, एक कृष्ण -धवल पिक्सलसाठी (याला काहींअंशी रंगीत कॅमेऱ्याची क्षमता दिलेली आहे ), एक कृष्ण -धवल मेडासाठी.

(ब ) बॅक शेलवर तीन रंगीत कॅमेरे आहेत ते पॅराशूट उघडतानांची चलचित्रे घेतील.

(क ) अवरोह टप्प्यावर एक कॅमेरा आहे, तो रोव्हरचे वरून निरीक्षण करेल.

(ड ) इंजेन्युइटीवर दोन कॅमेरे आहेत, त्यातील एक रंगीत कॅमेरा मंगळप्रदेशाचे तिरकसपणे निरीक्षण करेल आणि दुसरा कृष्ण – धवल दिक् चलन करेल.

(F)उड्डाण :

(अ )उड्डाणाचे ठिकाण – फ्लोरिडा मधील केप कॅनाव्हरल एअर फोर्स स्टेशनचे स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स 41.

(ब ) प्रक्षेपक – युनायटेड लॉन्च अलायन्सचा व्ही 541.

(क ) उड्डाणाच्या वेळी पृथ्वी ते मंगळ अंतर – 105 दशलक्ष किलोमीटर्स

(ड ) अंतराळयान पार करणारे अंतर, पृथ्वी ते मंगळ – 497 दशलक्ष किलोमीटर्स

(G) मंगळावरील मोहीम :

(अ ) मंगळावतरणाची तारीख – 18 फेब्रुवारी 2021, इस्टर्न टाइम झोन नुसार दुपारी साडेतीन वाजता. म्हणजे भारतीय वेळेनुसार 19 फेब्रुवारी 2021 ला पहाटे दोन वाजता. त्यावेळी मंगळावर स्थानिक सौर वेळेनुसार दुपारचे 3.46 वाजले असतील.

(ब ) उतरण्याचे ठिकाण – जेझेरो क्रेटर, 18° अक्षांश, 77° रेखांश

(क ) रेडिओ सिग्नलला 18 फेब्रुवारी 2021 ला मंगळापासून पृथ्वीपर्यंत यायला लागणारा वेळ – 10.5 मिनिटे (एक दिशीय प्रकाश वेळ )

(ड ) मोहिमेची कालमर्यादा – एक मंगळवर्ष (687 पृथ्वी दिवस )

(इ ) गोळा केल्या जाणाऱ्या नमुन्यांची संख्या – कमीत कमी 30

(फ ) इंजेन्युइटीच्या उड्डाण परिक्षणाची कालमर्यादा – 30 मंगळ दिवसपर्यंत ( साधारण 31 पृथ्वी दिवस )

(H)मोहिमेचा खर्च :-

नासाने अंतराळयान बांधणी व प्रक्षेपण यांसाठी अंदाजे 2.4 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत.

रोव्हर मंगळावर उतरवणे व रोव्हरचे मोहीम काळादरम्यानचे मंगळावरील भ्रमण यांसाठी अंदाजे 300 दशलक्ष डॉलर्स खर्च येणार आहे.

इंजेन्युइटी हेलिकॉप्टरच्या बांधणीसाठी 80 दशलक्ष डॉलर्स खर्च आला आहे व ते ऑपरेट करायचा खर्च 5 दशलक्ष डॉलर्स येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments