आज फांदी सुन्न झाली
पक्षी ही भांबावले
स्तब्ध नीरव शांततेने
क्षण घडीभर थांबले

संपली होती व्यथा ती
मूक क्रन्दन थांबले
प्राण झाले मुक्त तरीही
भय अजून ना संपले

एकट्याने सोसले जे
हाय आम्हा ना दिसे
जे दिसे ते भास सारे
मंद शीतल शांतसे

का कधी कळलीच नाही
वादळे मनी चालली
का कदाचित भिंत होती
तू मधोमध बांधली

वाट होती ओळखीची
मीही तीवर चाललो
चूक माझी हीच झाली
ते तुला ना बोललो

राहिलो मी रिक्तहस्ते
आठवणीही सांडल्या
मन करी थरकाप पाहून
भिवविणाऱ्या सावल्या

@sandeepbapat

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Sumeet paygude

खुप छान