आमचं काय तसं नसतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
गरमागरम पोळीवरती
तूप चमचाभर लागतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
काम लोकांनी करायचं
पण शिस्तीत व्हायला लागतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
दुपारी नाही झोपलं तर
डोकं दुखायला लागतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
उपासाला सतरा प्रकारचं
खाणं मात्र लागतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
बस समोरनं गेली तरी
रिक्षानंच जायचं असतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
मोडून पडलं तरी
बिलकुल वाकायचं नसतंय

शेअर करा..

guest
3 Comments
Inline Feedbacks
View all comments
Nimbalkar B

सुंदर.. पुणेकरांवर लिहिली आहे का कविता ?? ? छान..

Sameer

व्वा मस्त आहे कविता.. पुणेकरांचे अचूक वर्णन केले आहे आपण.. सुरेख