तो चंद्रमा नभीचा अन गीत ते पुराणे
हरपून भान आज जातील ते दीवाणे

शब्दात नाद आहे श्वासात सूर ओला
अलवार भावनांचा होई रिता न प्याला

गालावरील लज्जा टिपतात चंद्र किरण ते
स्मितहास्य खुलुन येई मिटले जरी नयन हे

पाहून प्रीत होई तो शशी जरा अधीर
मेघा म्हणे आडोसा धरीशी जरा समोर…

©sandeepbapat

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments