डोळ्यामधला भाव तुझ्या तो अनोळखी का वाटे गं?
रंगवलेले चित्र आपले कृष्ण धवल का भासे गं?

काल अचानक स्वप्नामधले घर का दिसले नाही गं?
अन घरट्यातील दोन पाखरे बावरलेली दिसली गं

गाणी जी दोघांनी गायिली शब्द आठवत नाहीत गं
मोहवणारी धुंद बासरी निःशब्द आज का झाली गं?

पैलतीराचा मोह अनावर कधीच इतका नव्हता गं
रंग गंध अन शब्द न उरले तरीही तृप्त मी आहे गं 
©sandeepbapat

शेअर करा..

guest
3 Comments
Inline Feedbacks
View all comments
Sameer

खूप सुंदर कविता आहे. आम्हाला आपल्या इतरही कविता वाचायला आवडतील..