मर्यादित शब्दात सखोल आशयाचा तांका संग्रह
———————————————————–
प्रसाद सावंत
तांका हा एक हायकू सारखाच एक जपानी काव्य प्रकार. हायकू जसा कवितेचा सर्व आशय तीन ओळीच्या रचनाबंधात सामावला जातो तसाच तांका हा देखील विशिष्ट म्हणजेच ५ +५ +७ या पहिल्या तीन ओळीच्या
यातही ५ +७ +५ +७+७ अशा आकृती बंधात उत्तम रचना कवी पोळ यांनी केलेल्या पानोपानी जाणवत आहेत. व पुढे ७ +७ या ‘वाका’ या जपानच्याच दुसर्या एका रचनाबंधाच्या अनुषंगाने पाच ओळीत आणि संपूर्ण ३१ शब्दावयवाची रचना करून त्यातून अनेकविध विषयावरचे आपले मनोगत उलगडणारा एक काव्य प्रकार श्री. प्रकाश पोळ हे ‘कातरवेळ ‘ या कविता संग्रहातून समर्थपणे हाताळताना दिसतात. तांका मध्ये पहिल्या दोन किंवा तीन ओळीतूनच कवितेचा मतितार्थ किवा त्याचा विषयगर्भ अगदी सहजपणे ध्यानात येतो.यात साधारणपणे २०० ते २५० आशयगर्भ ताकांची ओळख कवीने करून दिली आहे. यातही ५ +५ + ७ किंवा ५ +७ +५ अशी रचना बंधाची स्वतंत्रता कवीने घेतल्याचे जाणवते.
यात ताकाची रचना करताना उजेड हा स्वत: जागत असणं ही एक कवीला सूचलेली अशीच एक अप्रतिम संकल्पना.
मस्त उजेड
मंद तेलवातीत
उजळलेला
शुभ रात्री म्हणत
स्वत: मात्र जागत
रात्रीच्या वेळी जसा देवघरातील दिव्यात तेलवातीने उजळणारा, आपल्याला शुभ रात्री म्हणत आपल्याला शांत झोप देणारा हलका आणि मंद प्रकाश स्वत मात्र जागत असतो, ही कल्पना मांडताना दुसर्याच्या सुखासाठी आपण झिजण्याची त्यागाची भावना कवी एका छोट्याशा प्रसंगातून सहज व्यक्त करतो.व एका परोपकारी वृत्तीचे व त्यागाच्या व सहनशीलतेच्या मनोवृत्तीने जगण्याच्या तत्वज्ञानाचीच जणू मांडणी करतो. अशा छोट्या छोट्या प्रसंगातून तत्वज्ञानाच्या मांडणी स्वरूप असलेले ताका,पोळ यांच्या बर्याच ताका रचनेत सापडतात. तर शिक्षणाचे महत्व पुस्तकाद्वारे सांगतानाच त्यात मायेच्या ओलाव्याचीही आवर्जून प्रतीती देण्याला ह्या रचनाबंधातून ताकाकार विसरत नाहीत.
सांगता ज्ञान
पानांमागून पान
सरस्वतीचे
शिक्षणाचे महत्व
ग्रंथ देत ममत्व
आपल्या सभोवती पशूपक्षीही आपण नांदताना बागडताना नेहमीच बघत असतो, पण याच निसर्गाकडून या ताका रचनाकाराची दृष्टी एक सकारात्मक आनंद घेताना जाणवते. व त्यातही त्याच्याप्रती असलेले निसर्गप्रेम,पक्षीप्रेम अगदी ओतप्रोत ठासून भरलेले दिसते.
झुलता खोपा
सुगरण बांधते.
पिलं खेळती
यथासांग सगळी
निसर्गात नांदती
याचप्रमाणे नावात काय आहे या विल्यम शेक्सपियर यांच्या
जगदविख्यात संवादात्मक उक्तीच्या अनुषंगाने तांकाकार एक तत्ववाणी जगासमोर मांडताना दिसतो.
नावात काय !
नावात काय नाही ?
सर्वच आहे
जीती जागती व्यक्ती
व्यक्तिरेखा प्रकृती
व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती हे जरी खरे असले तरी प्रत्येक प्रवृत्तीच्या व्यक्तिमत्वात वेगळेपण कवीला जाणवते तसा तो तांका रूपाने व्यक्त होताना लिहून जातो.
ऐनाच ना तो
पाहते ऐन वेळी
वेळचे वेळी
रूप स्वत: देखणं
सदा छान दिसणं
तसेच
रंग सोहळे
सजलेले सगळे
पाहाती डोळे
जरी वेगवेगळे
भावतरंग भोळे
अशा अनेकविध व्यक्तिमत्वाच्या रंगछटाना कवी तांका रूपाने अधोरेखित किंवा उलगडून दाखवताना दिसतो. प्रकाश पोळ यांनी तांका हा जपानी काव्य प्रकार संग्रह रूपाने मराठी वाचकांना परीचीत करून देऊन कमी शब्दात मोठ्या आशयाला वाट मोकळी करू दिली आहे असे म्हणावे लागेल.
कातरवेळ (तांका संग्रह)
कवि प्रकाश पोळ
पृष्ठे १४४
संवेदना प्रकाशन
मूल्य रु. २५० /-
शेअर करा..