जन्म हा बाईचा

खरचं सोप नसते हो
मुलगी बनुन जन्म घेणे,
स्वताची स्वप्नं विसरून
दुसऱ्यांन साठी जगणे.

दोन घरे भेटुन सुध्दा
एकही नसते हक्काचे,
आनंदी ठेवून सर्वाना
आयुष्य वेचते दुःखांचे.

बोल एकत सर्वांचे,मन
मारुनच जगाव लागते,
आयुष्य तिचच पण का ?
निर्णय दुसऱ्यांचे असते.

नसली चुक तरीही का बोट
तिच्या कडे दाखवल्या जाते,
जन्म हा घेता बाईचा, मग
संकटाशी ती झुंजत राहते.

अपेक्षा नसते मोठी काही
फक्त दोन गोड बोल हवे ,
स्वप्नांना जाणून तिच्याही
एकदा द्या ना पंख नवे.

Neha vitthal gote

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments