मैत्री…सुखाची ओंजळ

मैत्री..

थंड हवेची झुळूक रणरणत्या उन्हात…

मंद तेवणारी ज्योत वादळ वार्‍यात…

मैत्री..

रप रप पावसातील मातीचा सुगंध…

संसारातील रहाटगाडग्यातून हलकीशी उसंत…

मैत्री..

कधी रुसवे फुगवे कधी क्षणाचे भांडण…

रक्ताचे नसले नाते तरी हक्काचे अंगण…

मैत्री..

गतकाळातील रम्य आठवणींची शिदोरी…

थकलेल्या मनाला पुन्हा उमेदीची उभारी…

मैत्री

खळखळून हसताना अश्रूंची ओघळ…

आभाळभर दुःखाला सुखाची ओंजळ…

आरती रणदिवे मावडिकर

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments