आयुष्य

आयुष्य कस असत हे

कोणालाच माहिती नसत

आयुष्या मध्ये अनेक वाटा असता

कधी रडवणारी तर कधी हसवणारी

आयुष्य निघून जात फक्त हा हा म्हणत….

 

आयुष्य जगत असताना

संघर्ष हा करावाच लगतो

संघर्ष म्हणजे नाण्याच्या दोन बाजू

कधी चिंता तर कधी पाठ होणारच

आयुष्य निघून जात फक्त हा हा म्हणत….

 

आयुष्य निघून जाते

खिसे अपुले भरताना

वेळ जाते निघून

दिवस रात्र धावताना

आयुष्य निघून जात फक्त हा हा म्हणत….

 

आयुष्य थोड का असेना

आपल्या माणसांनी ओढ लावणार आसवे

कधी रिमझीमणाऱ्या तर

कधी झिमझिमणाऱ्या आसवे

आयुष्य निघुन जात फक्त हा हा म्हणत….

 

आयुष्य हे तलवारीचा धारे सारख असत

कधी मून मुन नार तर

कधी पुठ पूट करणार

यालाच तर म्हणता खर जीवन जगणं 

आयुष्य निघून जात फक्त हा हा म्हणत….

 

आयुष्या मध्ये धाव धाव धावतो आहोत

पण दिशा मात्र कळत नाही 

हृयाचे पाऊल कधी

हृया कडे वळत नाही 

आयुष्य निघून जात फक्त हा हा म्हणत…

 

आयुष्यात इतक जगून झाल पण

जगायलच वेळ नाही

जगतो आहोत कशासाठी

काहीच कसला मेळ नाही

आयुष्य निघून जातंय फक्त हा हा म्हणत…

 

आयुष्यात एक क्षण येईल असा

घेऊन जाईल हा श्वास

अर्ध्यावरच थांबलेला असेल 

आयुष्यच प्रवास  

आयुष्य निघून जात फक्त हा हा म्हणत…

 

अजूनही वेळ आहे 

थोड तरी जगून घ्या

सुंदर अशा जगण्याला

डोळे भरून बघून घ्या

आयुष्य निघून जाईल हा हा म्हणत…

                                         

                                  ऋतुजा सोनवणे 

 

ऋतुजा समाधान सोनवणे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments