काय अर्थ आहे
जिंदगीचा साला भलताच
वेगवेगळा परामर्श आहे
तुटे पर्यंत ताणून तुटल्यावर
जोडण्यात काय अर्थ आहे…….
जो तो मानतो मीच शहाणा
बाकी सर्व मलाच माना
सत्तेचे भुकेले सारे
पदोपदी स्वार्थ आहे.
अन तुटेपर्यंत…
नातेसंबंध ही कळेना
कळले जरी,तरी वळेना
राजाराणीतही ताळमेळ जुळेना
उरला प्रत्येक उपकारार्थ आहे.
तुटेपर्यंत….
व्यवसाय असो की समाजकारण
प्रशासन असो वा राजकारण
नीतीचा वांधा हाच धंदा
डावपेचात सर्व दृढार्थ आहे
तुटेपर्यंत..,…..
दोन दिसांची जिंदगी
वादविवाद सारे बरबाद आहे
राहून सोबत करा गंमत
जीवनाचा हाच मतितार्थ आहे
तुटेपर्यंत…
नको कुरघोडी अन् धरसोडी
थांबवा ह्या खोडी
जगा आणि जगू द्या
हाच खरा परमार्थ आहे..
तुटेपर्यंत..
प्रा.महेश बिऱ्हाडे
पेझारी रायगड
शेअर करा..