नाना रंग, नाना तऱ्हा

नाना रंग, नाना तऱ्हा
डोळे काळे आणि पांढरे
जन्म घालती रंगीत स्वप्न !
काय जादू केली देवा,
मला नेहमीच पडतो प्रश्न.
अपशकून म्हणुनी सारती
दूर त्या काळ्या रंगाला,
अन् त्याच शुभ कार्याला
काळाच रंग लावती केसांना !
पांढरा शुभ्र कापूस,
त्याचे कापड रंगबिरंगी.
इंद्रधनू हाती घेवूनी
धनुष्य सप्तरंगी.
निळेशार हे आकाश,
हिरवेगार जंगल विस्तीर्ण ,
काळे कुट्ट ढग जमले,
कधी लाल भडक सूर्य.
निळा शार अथांग सागर,
अमावशेची काळी कुट्ट रात्र,
पांढरा शुभ्र झेंडा घेवूनी,
शत्रू बनतात तहात मित्र.
नाना रंग त्यांच्या नाना तऱ्हा,
खूपच सुंदर आहे रंगांची किमया.
रंगातच आहे खरी रंगत न्यारी,
न्हाऊन निघते सारी दुनिया.
कविमोलअमोल बारई

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments