मन चिंब झाले 

मन चिंब झाले 
मी तुला, अन् तू मला पहिल्यांदा पाहिले,
घन ओथंबून आले आणि मन चिंब झाले.
तू ज्याक्षणी एकरूप झालीस,
मोरपंखी स्वप्न पूर्णत्वास आले.
एकमेकांत गुंतल्याने आपले,
आसमंत स्वच्छंद झाले.
तूच होती जीची आर्ततेने,
वाट बघण्यात कित्येक युग गेले,
रुक्ष या जीवनी स्वरतार झंकारले,
सूर हे सरगमी पुनः एकदा लागले.
कित्येक दिवसांनी तू भेटशील नव्याने,
ह्याची गुंतागुंत मनात होतेय.
दिवसामागून दिवस जाताहेत,
मन माझे गुरफटतेय… वाट बघण्यात..!
“कविमोल” अमोल बारई

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments