महती सांगतो पावसाची

महती सांगतो पावसाची
निसर्गाच्या सोबतीला
असतो मी जेंव्हा जेंव्हा,
काहीतरी शिकवण मळा
मिळते तेंव्हा तेंव्हा.
झाडे लावा, झाडे जगवा
नि:स्तब्ध सांगतात वने,
नदी, नाले झुळझुळ सांगती
घाला नवी नवी धरणे.
झाडांनी या पाऊस येती
अपूल्या धरणीवरती,
कोण गड्या सांगील तुम्हाला
पावसाची ही किर्ती.
नदी, नाले हे वाहत जाती
पाणी वाया जाई,
अडवून ठेवा पाणी सगळे
दुष्काळ हा पळून जाई.
पावसाची कृपा जोवरी
पीकती हिरवी मळे,
पाण्यामुळे शक्य झाले
रोख रक्कम मीळे.
गरीबाचा तो श्रीमंत झाला
याच पावसावरती,
म्हणून मी सांगतो तुम्हाला
पावसाची ही महती.
“कविमोल” अमोल बारई

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments