| ग्रीष्म |
| ग्रीष्माच्या मोसमातले कडाक्याचे उन्ह, |
| उन्हाच्या दाहकतेने शरीर होते सुन्न: |
| घामांच्या धारांमध्ये दिवस सारा सरतो, |
| सरतेशेवटी उद्याचा मनामध्ये धाक भरतो. |
| काम करण्याच्या इच्छा साऱ्या मरतात, |
| बुट्या मारण्याची कारणे मनामध्ये भरतात. |
| पण, |
| गुलमोहर नेहमी उन्हातच बहरतो, |
| उन्हाच्याच दाहकतेत आंबाही मोहरतो. |
| पिंपळाच्या पानांची होते ग्रीष्मात गळती, |
| आणि फुटते त्यांना नवीन कोवळी पालवी. |
| हयांच्यापासून शिकावे जगायचे कसे ठाम, |
| उन्हामध्ये उभे राहून करावी त्यांच्या करडेपणावर मात. |
| निसर्गसुद्धा नेहमी काहितरी शिकवितो, |
| झाडांच्या माध्यमातून आपल्याला दर्शवितो. |
| जीवनातही असतात कित्येक उन्हाळे, पावसाळे, |
| सुख: दुःखाच्या रुपात कारणे असतात निरनिराळे. |
| जरी लागली गळती दुःखाच्या स्वरूपात, |
| नव्याने करावी जीवनाची सुरुवात. |
| “कविमोल” अमोल बारई |
शेअर करा..