स्त्री

स्त्री
स्त्री ही ईश्वराची अप्रतिम
सुंदर कलाकृती,
प्रसन्न, शांत, शीतल
ममताची मूर्ती.
         बायकोच्या रुपात प्रेमाची
         आणि मातृत्वाची सावली,
         कधी प्रेमळ बहीण तर
         कधी प्रत्येकाची माऊली.
स्त्री ही रागात जेंव्हा
होते चुरचुर,
बेचिराख झालेत इतिहास साक्षी
महारथी वा शूर.
         स्त्री ही नारी शक्ती
         वात्सल्याची मूर्ती,
         प्रेम आणि त्याग, अशी
         जगभर तिची कीर्ती.
नमन त्या स्त्रीत्वाला
आदर्श अशा मातृत्वाला,
खुलून उठणाऱ्या व्यक्तित्वाच्या
प्रेमस्वरूपी सौख्यत्वाला.
“कविमोल” अमोल बारई
अमोल बारई

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments