ओढ भेटीची

खूप दिवसापासून वाटतंय, तुला एकदा भेटावं,
एवढ्या दिवसांचं वाढलेलं अंतर क्षणार्धात कापावं

नदीच्या एका तीरावर मी तर दुसऱ्या तीरावर तू असावं,
पण एका मिठीसाठी मन मात्र कासावीस व्हावं.

तू दिलेल्या मोगऱ्याच्या सुगंधासह तुझा गंध श्वासात भरावं,
खांद्यावर तुझ्या डोकं ठेऊन आयुष्याचं स्वप्नं बघावं.

मी बोललो नाही तर तू मनातलं सारं काही ओळखावं,
आणि रोज रोज त्या देवाकडे तुलाच मागावं.

खूप दिवसापासून वाटतंय तुला एकदा भेटावं,
आता तूच आपल्या नात्याला एक छानसं नाव द्यावं

 

-अजय आप्पासो माळी

अजय आप्पासो माळी

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments