शब्द माझे, सूर तुझे
गीत दोघे गाऊ या
जीवनाच्या मैफिलीला
संगतीने सजवूया.. ।।१।।
वाट माझी पाय तुझे
सावलीला शोधूया
जीवनाची वाट आता
संगतीने चालूया….।।२।।
सूर्य माझा चंद्र तुझा
सांजवेळा साधूया
ना तुझे, ना माझे आता
एक गाणे गाऊया….।।३।।
– आनंद कुलकर्णी
शेअर करा..