अंधकारातून एक तेजस्वी किरणाचा
महामानव तू दुखऱ्या जीवांचा,
राजकारणाचा फास लावित
जमले नेते आळीपाळीने,
नवी उभारी, नवी अशा देणारा
खंबीर खलाशी जणू तू सामान्य जनतेचा..

बहुजन जनतेचे भविष्य उजळवले
प्रत्येकाच्या मनात घर केले,
नेता नव्हे, मंत्री नव्हे
तू मित्रासम पाठीराखा आम्हा सर्वांचा
खंबीर खलाशी जणू तू सामान्य जनतेचा..

देवाची दारे उघडली, तळ्याचे पाणी सुखावले
झाली निळ्या रंगाची नवलाई अन
कालातीत सारेजन सुखावले,
निळा सैनिक उभा राहिला चळवळीचा
खंबीर खलाशी जणू तू सामान्य जनतेचा..

ब्राह्मण, मराठा, कुणबी,कोळी
माळी, सुतार वा असो कुणी मदारी
एका धाग्यात विणले सारे बांधव,
प्रतीक तू बनला एकात्मतेचा
खंबीर खलाशी जणू तू सामान्य जनतेचा..

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments