येरेपावसा

पाऊस असतो ओलाचिंब

पाऊस असतो ओलाचिंब, पाण्यात न्हाणारा
उंच उंच आकाशातून वेडयासारखा सांडणारा,
पाऊस असतो ओलाचिंब, पाण्यात मावणारा
सतत वाहणारा, सतत धावणारा

पाऊस असतो ओलाचिंब, फ़ुलाफ़ुलात राहणारा
मातीच्या सुगंधात वावरणारा,
अंगणात मनसोक्त धुडगूस घालणारा

पाऊस असतो ओलाचिंब, पन्हाळी भरून आवाज करणारा
तान्ह्या बाळाला कधी उगाच घाबरवणारा
पाऊस असतो ओलाचिंब, प्रियेला थांबविणारा
प्रियकराला तिच्या जवळ नेणारा

पाऊस असतो ओलाचिंब, शांत..कधी ओरडणारा
लहान लेकरासारखा बागडणारा चोही बाजूस..
कधी देव सारखा मांडी घालून शांत बसणारा

पाऊस असतो ओलाचिंब, सांगणारा गोष्टी अनेक
दूरदेशी राहणाऱ्या राजाराणीच्या..
लपलेल्या कवितेला कधी ओठावर आणणारा
कधी जाणून-बुजून मैफिल सजवणारा..

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments