आणि..मी थोडा वेळ गप्प बसलो..ती काहीच बोल्ली नाही..हळूच तिने नजरेनी माझ्याकडे पहिल..दोघेही,.जे समजायच ते समजून गेलो..

पुढच्या रविवारी ती मला नदी किनारी भेटायला आली..थोड़ी शांत,थोड़ी लगबग अन थोड़ी भेटण्याची ओढ़ ही..दोन तास आम्ही एकमेकंशी बोलत राहिलो..दोघेही,.जे समजायच ते समजून गेलो..

नंतर एका गुरुवारी,..तिला तड़क जाऊन भेटलो,सरप्राइज ने ती किती खुश झाली, गोबऱ्या गोबऱ्या गालाची तिच्या गुलाबी गुलाबी क्रीम पेस्ट्री झाली, या सुखद धक्क्यात आम्ही स्वतःला विसरलो..दोघेही,.जे समजायच ते समजून गेलो..

मग ती म्हणाली मी येते तुला भेटायला, माझ्या जीवाचा जणू ठाव घ्यायला..तिचे येणे म्हणजे ग्रीष्मा नंतर येणारा श्रावण,..पावसाच्या गार शिडकाव्यात कित्येक तास भिजत राहिलो..दोघेही,.जे समजायच ते समजून गेलो..

दूर रहाणे अवघड होत गेले, दोघांचे फ़क्त ‘भेटणे’ फार कमी वाटू लागले, एकदा मिठीत ओढ़त विचारलच मी तिला, एकमेकांच्या डोळ्यात आम्ही एकमेंकान्ना होतो भेटलो,..दोघेही,.जे समजायच ते समजून गेलो..

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments