बोधिवृक्ष

मी कान्हा नाही, न मी कृष्ण आहे
तुझ्या मनातला मी मात्र एक बोधिवृक्ष आहे…

नको भेटू मला, नको गोड काही
फक्त मला प्रेम हवे अजून काही नाही..
तुला जो प्रश्न पडतो, मी त्याचे उत्तर आहे
तुझ्या मनातला मी मात्र एक बोधिवृक्ष आहे…

आठवलं का, जेव्हा तू शाळेत एकटा जायचास
तुझ्या सोबत चालणारं कोण होतं,
विसरलास जेव्हा एखादे गणित सोडवणारे कोण होतं,
उघडून पहा जुना अल्बम, त्यात माझा फोटो आहे
तुझ्या मनातला मी मात्र एक बोधिवृक्ष आहे…

पुढे गेलास कॉलेजात, नव्या दुनियेच्या खोलात
मित्र मैत्रिणीसोबत- ‘प्रियजन’ ही आलेच ओघात,
केलीस डिग्री झालास मोठा
कम्बरेला बांधलेला कधीच तुटला करगोटा,
वेध लागले क्षितिजाचे, विमान उंच हवेत आहे
तुझ्या मनातला मी मात्र एक बोधिवृक्ष आहे…

मुलं बाळ झाली सानुली, उत्तम जोडीदार
प्रेमाचे लोणचे आता अधिक चवदार,
एकामागून एक, पायऱ्या चढत गेलास बघ
अवघ्या काही वर्षात पादाक्रांत केलेस जग,
ते सगळं ठीक, तू मला कधी भेटणार आहेस..
मी कान्हा नाही, न मी कृष्ण आहे
तुझ्या मनातला मी मात्र एक बोधिवृक्ष आहे…

– ओम नमो भगवते वासुदेवाय

© Aumkar Upadhye 2019

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments