लिहणे रोजचेच

असेच लिहणे होत आहे..
लिहणे माझे तसे रोजचेच हे..!!

मनाला शोधणे होत आहे..
पाहणे शोधणे रोजचेच हे..!!

विचारात रमायचे असे की ..
आठवणे विसरणे रोजचेच हे..!!

मनाला भावले ते सारे हवे
मागणे मिळवणे रोजचेच हे..!!

नको ते शब्दास शब्द जुळवणे..
असणे नसणे तसे रोजचेच हे..!!

हा छंदच जणु झाला असे आता
लिहीणे माझे तसे रोजचेच हे ..!!

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
anurag andy

khup chhan bro… keep it…