नातं मनाशी

कधितरी असच आपल्यासाठीही जगाव्
अंधाराशी मैत्री करुन काळोखात रमाव्

आपल्यातील स्वतःलाही कधीतरी ओळखाव
ओळखीचच् बनुन मग अंतरंगात शिराव

प्रेम मैत्री नात् सारकाही बाजुला कराव
आपणच आपल्याशी नात जोडुन बघाव

गर्तेत आठवणींच्या अस काही रमाव
जणु काही भावनांनी आसवे गाळुन रडाव

सोडवुन सारा गुंता मग मनामध्ये हसाव
आपल्या मधेच आपण अस एकदातरी रमाव !
आपल्या मधेच आपण अस एकदातरी रमाव !!

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
anurag andy

mastch…