मातोश्री

आई…. तू असतांनी गर्भवती,

तुझा रावांनी साथ सोडला ।

झुंज देऊनी संकटात,

तू जीवनाचा मार्ग जोडला ।

तू जीवनाचा मार्ग जोडला ।। धृ ।।

तळ पायानी वाट चालून

भूमीवरती घर शोधला।

दिन रात कष्ट करून,

तू दिला ग जन्म मला

तू दिला ग जन्म मला ।। 1 ।।

रडतांना मला तू पाहून,

अश्रू माझे ग पुसले ।

माझा नशीबी जीवनाचे

संकट सारे तू हरले ।

संकट सारे तू हरले ।। 2 ।।

उपाशी तू राहुन ,

पोटभर मला घास भरविला ।।

ग्लासावरती पदर ठेऊन

तू मला ग पाणी पाजल ।

तू मला ग पाणी पाजल ।।3।।

ईश्वराची ममता देऊन,

गुरूजीच्या अभ्यास दिला ।

धन्य माझी आई सकुबाई

तुझात खरा मी देव पाहिला ।

तुझात खरा मी देव पाहिला ।। 4 ।।

गजानन पुंडलिक येरणे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments