हसुन आयुष्याला देऊ उत्तर..
परिस्थितीशी लढु सर्वदा,जरी आले संकटे बेहत्तर..
राग लपवूनी ओठांखाली स्मित हास्याचे लावू अत्तर,
बोलुन, रागवून नको एक ही मन दुखवायला,
खोटे खोटे का असेना, हसुन आयुष्याला देऊ उत्तर..
कोण चुकीचे, कोण बरोबर नको हा प्रश्न सध्यातर, आयुष्याच्या चित्रपटात नसतोच ना रे मध्यांतर..
शेवटी कोण कोणाचे नसतेच,हेच आहे खरेतर
खोटे खोटे का असेना, हसुन आयुष्याला देऊ उत्तर.
अनुभवाविण कोणी पाहिले इथले जन्म मृत्यु,
कळले तर जगलो असतो एका रेषेत जरातर..
माफ ही केलं असतं स्वतःला ,जगलो असतो थोडतर,
खोटे खोटे का असेना, हसुन आयुष्याला देऊ उत्तर..
कोणाच्या बुडाखालचा कशाला पाहायचा अंधकार,
घाव मनावरचे सोसत सोसत देऊ आयुष्याला आकार..
अनेकांशी जोडताना नाते ,परमात्म्याशी मिळवू अंतर
खोटे खोटे का असेना, हसुन आयुष्याला देऊ उत्तर..
— डॉ. देवकुळे आकाश अर्जुन.
शेअर करा..