सत्य

सत्य

——-

काढलेले चित्र आणि पाहिलेले वेगळे

चित्रकाराने असे का सत्य सारे झाकले

कोणत्या ऋतूतला हा खेळ सारा मांडला

रंग ओल्या आसवांचा का उगा पावसाळा

या धुक्याचे त्या धुक्याशी वैर का रे चालले ?

झिंगलेली रातराणी गोठलेला चंद्र का

पेटत्या गाण्यात व्हावे सप्तकाने मंद्र का ?

या जीवाने त्या कुणाशी नातेच का टाकले

आठवेना कुंचल्याला वागलो उलटे कसे ?

कोणत्या हातात आलो ज्यास न सृष्टी दिसे

या जगाचे त्या जगाला आंधळे का दाखले ?

                                                  प्रसाद सावंत

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments