बापाची वाघीण

तूच मुक्ताई, तूच पद्मिनी
सीता, द्रौपदी, सावित्री तूच,
काळोखाच्या अंधारात
उजळणारी पणतीही तूच,
शिवबाची जिजाऊ तूच,
भीमरावची रमाई तूच,
तूच आहेस झांसीची राणी
अन रायगडची हिरकणीही तूच,
सिनेमाच्या नटी पेक्षा, इतिहासाची मर्दानी तू हो
पापा की परी नाही बापाची वाघीण हो……

तुझ्यातल्या स्त्री शक्तीला
ओळखून तू आव्हान दे,
बांगड्या – चुडा सोड
तलवार तू हाती घे,
डोळ्यात आता अश्रू नव्हे
ज्वाला तू पेटू दे,
तुझ्यातला आत्मसन्मान
आता पेटून उठू दे,
लाजाळू च फुल नाही, निखाऱ्यांची चिंगारी हो
पापा की परी नाही बापाची वाघीण हो……

वैष्णवी सुनील वावगे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments