| एक कविता… कवितेची ! |
| कविता जीवनाला ताल आणि तोल देते, |
| मुक्या पाखराला चाल आणि बोल देते. |
| अनभिज्ञ जीवनाला, अवचित मोल देते, |
| कल्पचकोर पक्षाला, मोहक चंद्रप्रकाश देते. |
| कविता आयुष्याला, ताल आणि लय देते, |
| संपूर्ण जीवन जगायला, परिपूर्ण वय देते. |
| कविता या जीवनाच्या, व्यापकतेची जाण देते, |
| घडणाऱ्या प्रत्येक बाबीला, समर्पक मान देते. |
| कवितेची वर्णन कविता, तिच्या मर्माला खोल देते, |
| म्हटलेच आहे, कविता जीवनाला ताल आणि मोल देते. |
| “कविमोल” अमोल बारई |
शेअर करा..