जुने मित्र, जुने किस्से !
कंपनी पगार देते म्हणून काय झाले,
माझे मित्र मला नवी उभारी देतात.
काम तर आम्ही नेहमीच खुप करतो,
पण मित्र जुन्या आठवणींच्या आहारी नेतात.
जुने मित्र, जुने किस्से
जुन्याच सर्वांच्या आहेत आठवणी,
एकामागून एक सर्व,
काढत आहेत आपल्या साठवणी.
कुणी पहिलीपासून, कुणी चौथी
तर कुणी आलेत आठवीपासून,
या मित्रांचा गोतावळा,
जवळ करतो असलेल्या दुरीपासून.
सगळ्यांनाच आता मुले मुली,
सगळे पालकांच्या पंक्तीत बसले.
मुले शाळेत जायला लागली, पण
आमच्या शाळेचे दिवस नाही सुटले.
हसत खेळत रहा मित्रांनो
अशीच आनंदाची मशाल पेटवा,
आता आपली मैत्री आणखी घट्ट करूया,
चला कुणीतरी पटकन एकमेकांना भेटवा.
“कविमोल” अमोल बारई
शेअर करा..