शुभेच्छा

शुभेच्छा

कधी रूसलीस, कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस.
मनातले दुःख कधी, समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खुप सुख दिलेत.

नातं तुझं आणि माझं, गगनाला भिडणारे
आयुष्याला प्रत्येक, कणांकणांन भरणारे.
नातं तुझं आणि माझं, वादळातही तरणारे,
विश्वासाचा किनारा होऊन लाटांना मागे सारणारे.

डोळ्यांतल्या आशेला देईल हे नाते आकार,
अखंड साथीतून करूया आपण सर्व स्वप्न साकार. तुझ्यासाठी दिवस आला, फुलांसारखा सजून,
तुझ्यासाठीच दिवस आला, अंतरंग भरून …

बघ हे आकाश गाऊ लागले, आनंदाचे मेघ भरून,
रान सारे न्हावू लागले, मस्तीत दंग होऊन.
दूर बघ सागरावरती, या दिवसाची हाक गेली,
शुभेच्छांची भरती बघ तर… किनाऱ्यावरती आली.

अमोल बारई “कविमोल”

 

अमोल बारई "कविमोल"

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Dhiraj sutar

खूप छान आहे 👍🌷