आयुष्याच्या वाटेवर

आयुष्याच्या वाटेवर साथ तुझीच असावी,

स्वप्नांच्या भरतीसाठी पंखे ही तुझीच असावी ..

मझातल्या कमजोरिंवर शाल तुझीच असावी,

आणि माझ्यातल्या खुब्यांवर झालर देखील तुझीच असावी..

सुख उपभोग ताना साथ तुझीच असावी,

पण दुःखाच्या काळात तुझ्या अश्रूनसाठी डोळे मात्र माझेच असावेत..

प्रेमाच्या सुंदर नात्याला ऊब ही तुझीच असावी,

माझातल्या वेडेपणाची सीमा देखील तूच असावी..

माझे मन हलके होण्यासाठी खांदा हा तुझाच असावा,

आणि रडताना ओठांवर हास्य फुलवण्यासाठी विनोदही तुझाच असावा..

शेवटच्या क्षनाला शेवटच्या श्वासासाठी मिठी ही तुझीच असावी,

आणि डोळे बंद होताना त्या डोळ्यातली शेवटची छबी देखील तुझीच असावी…..

@kirankhaladkar2000

Kiran

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments