वर्तमानपत्र

*८९ वर्तमानपत्र*
रोजच्या बातम्या करती हैराण,
वाचून मन ते होतसे विषण्ण,
एसटीच्या पत्र्याने कापले हात,
लम्पीने केला जनावरांचा घात.

निर्देशांक करी कोटींचा चुराडा,
वार्षिक सभेमध्ये झाला की राडा,
जॉन्सन बेबीचा परवाना रद्द,
रशिया युक्रेनचे चालले युद्ध.

निसर्ग कोपला, अतिवृष्टी झाली,
पूरामुळे पिकांची नासाडी झाली,
गुरेढोरे माणसं वाहून गेली,
वादातुन कोणी आत्महत्या केली,

साठमारी असे सत्तेची भरीला,
जाहिरातींचे बळ असे साथीला,
अग्रलेख पानात बौद्धिक संपते,
परी वाचण्यासाठी मन हुरहुरते.

✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
१७ सप्टेंबर २०२२
९८६०८८८७१०
©️ सर्व अधिकार आरक्षित.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments