धर्म

*९१ धर्म*
धर्म अभिमान, असावा जरूर,
फुकाचा गुरूर, कशासाठी.

प्रत्येकाला प्यारा,स्वधर्म आपला,
निंदता कशाला, परधर्म.

धर्मशास्त्रे सारी, निस्वार्थ सांगती,
का हो कष्टवीती, इतरांना.

चौकटीच्या आत, धर्म तो असावा,
बाहेर दिखावा, दांभिकता.

अभ्यासून धर्म, बना वैचारिक,
धर्माला मारक, कट्टरता.

धर्मातीत करा, मानवी जीवन,
करून पालन, मानवता.

धर्म आचरण, व्हावे स्वार्थाविन,
मिलिंदाला मान्य,माणूसकी .

✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
२० सप्टेंबर २०२२ (९८६०८८८७१०)
©️ सर्व अधिकार आरक्षित.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments