काहूर

जाता जाता तुला पाहिलं

अन् मनात काहूर माजलं

तुझ्याकडे येण्या धावलं

पण पायांनी त्याला रोखलं

 

 

नित्यक्रम असा सुरू झाला

दिवस ह्यातचं सरू लागला

बघशील का कधीतरी माझ्याकडे?

प्रहरही आता ठेंगणा झाला

 

 

एकदा मला तू पाहिले

नयन माझे स्तब्ध राहिले

तुझ्या डोळ्यात मला शोधले

पण प्रतिबिंब नाही सापडले

 

 

कल्पनाही अशीच होती

कधी सत्यात न उतरणारी

मनाला हलकी झुळूक देऊन

पुन्हा तुझ्याकडेचं आणणारी

शेअर करा..

guest
2 Comments
Inline Feedbacks
View all comments
Milind Kulkarni

सुंदर शब्दांकन 👌

Jagdish

खूप छान